लोकांना पाणी मिळू नये म्हणून लोखंडी स्टँड वर चढून फोड़ली ग्रा.प.ची पाणी टंकी; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गोंदिया :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,सालेकसा तालुक्यातील मक्काटोला येथे एक नवीनच संकट उभं झालय. अ म्हणूनचधिकतर जागी पाणी टंचाई होऊ नये म्हणून सामाजिक लोक प्रयत्न करतानी दिसतात, मात्र मक्काटोला येथील रविन्द्र चैतराम बडोले वय 40 वर्ष या इसमाने लोकांना पिण्याचे पाणी मिळू नये, त्यांना त्रास व्हावा, टंचाई व्हावी म्हणून थेट गावात पाणी पुरवठा करणारी पाणी टंकीच फोडून टाकली त्यामुळे कोरोना काळात पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली आहे. ही घटना 21 में रोजी सकाळी 10.30 सुमारास घडली. ग्रा.प.चे सरपंच रामप्रसाद तुकाराम दोनोडे यानी 21में रोजी पोलिस स्टेशन सालेकसा येथे प्रकरणाची तक्रार केली. मात्र आरोपी विरुद्ध काय कार्यवाही करण्यात आले हे अजुन गावकऱ्याना कळले नाही.
गावात पाणी टंचाई भेडासावू नये गावकऱ्याना शुद्ध पाणी मिळावे म्हणून मक्काटोला वार्ड क्रमांक 1 येथे पाच हजार लीटरची पाणी टंकी लोखंडी स्टैंडवर बसवान्यात आले होते. बोरवेलला इलेक्ट्रीक पंप जोडून पाणी भरने आणि नळ योजनेव्दारे पाणी पुरवठा करने सुरु होते. मात्र अचानक 21 में रोजी गावातीलच आरोपी रविन्द्र बडोले हातात कुराड़ घेऊन थेट पाणी टंकीच्या स्टैंडवर चढला आणि हतातील कुराडीने टंकीवर वार करून टंकी फोड़ली ऐन उन्हाळ्याच्या पाणी टंचाईत आरोपी टंकी फोडत असतांना सुखदास सहारे, पूरन सहारे, विद्यानंद बडोले, व शेजारी असलेल्या अनेकांनी त्यांला पाहले व हटकले पण त्याने फोड़ने बंद केले नाही, उलट मि फोड़तो तुम्ही फोटो काढ़ा, व्हिडिओ बनवा आणि जो बनते तो करा म्हणाला असे तक्रारीत नमूद आहे. वार्ड क्रमांक 1 च्या ग्राम पंचायत सदस्या सौ.देशप्रेमी विलास बडोले यांनी सदर घटनेची माहिती सर्वप्रथम सरपंच दोनोडे यांना दिले होते. सरपंच घटनास्थळी पोहचेपर्यंत आरोपी तिथुन नि%E