महिलांनी सुरू केलेला ‘मदतीचा एक घास’ हा उपक्रम म्हणजे भूकेल्या पोटाना दिलेला आधार आहे.

48

महिलांनी सुरू केलेला ‘मदतीचा एक घास’ हा उपक्रम म्हणजे भूकेल्या पोटाना दिलेला आधार आहे.

मदतीचा एक घास या महिला काँग्रेस च्या उपक्रमाला बाळू धानोरकर यांची सदिच्छा भेट.

महिलांनी सुरू केलेला 'मदतीचा एक घास' हा उपक्रम म्हणजे भूकेल्या पोटाना दिलेला आधार आहे.
महिलांनी सुरू केलेला ‘मदतीचा एक घास’ हा उपक्रम म्हणजे भूकेल्या पोटाना दिलेला आधार आहे.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी

चंद्रपूर:- मदतीचा एक घास हा उपक्रम मागच्या दहा दिवसापासून महिला काँग्रेस कडून  शासकीय रुग्णालयात सुरू आहे.या उपक्रमाचे उदघाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. या उपक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या आधी या उपक्रमाला वरोर्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राजुरा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांनी भेट दिली.

लॉक डाऊन मुळे अनेक लोकांच्या जेवणाचे हाल झाले आहे, अशा गरजू लोकांना जेवण मिळावे या उद्देशाने राज्य महिला काँग्रेस तर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला. आज चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळू धानोरकर यांनी या उपक्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी महिलांना या उपक्रमा साठी शुभेच्छा दिल्या. त्याच सोबत महिलांनी ज्या पद्धतीने धाडस करून हा उपक्रम सुरू केला त्याच कौतुक करून कोविड चा प्रकोप चालू असेपर्यंत हा उपक्रम सुरूच राहणार असे या वेळी त्यांनी सांगितले.

उपस्थित लोकांनी देखील कोविड चे नियम पाळून गरजू लोकांपर्यंत ही सेवा पोहचवली पाहिजे असे आवाहन त्यांनी वेळी उपस्थित नागरिकांना केले.बाळू धानोरकर यांच्या कडून देखील या उपक्रमाला रोज मदत येत आहे.

या वेळी प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर,जिल्हाध्यक्ष  प्रकाश देवतळे, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, नगरसेविका ललिता रेविलवार, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर सचिव वाणी डारला, लता बारापत्रे, राजेश सिंग चौहान, मोनू रामटेके उपस्थित होते.