महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा मोठा प्रादुर्भाव, आता पर्यंतराज्यात 130 रुग्णांचा मृत्यु.

52

महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा मोठा प्रादुर्भाव, आता पर्यंत राज्यात 120 रुग्णांचा मृत्यु.

महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा मोठा प्रादुर्भाव, आता पर्यंतराज्यात 130 रुग्णांचा मृत्यु.
महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा मोठा प्रादुर्भाव, आता पर्यंतराज्यात 130 रुग्णांचा मृत्यु.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.25 मे:- कोरोना वायरसच्या प्रादुर्भावा नंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी या बुरशीजन्य आजाराने महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. हर रोज राज्यात मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्र एकूण 2 हजार 445 म्युकरमायकोसिसचे रोगाचे रुग्ण समोर आल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

सध्या या घडीला महाराष्ट्रात 1 हजार 780 म्युकरमायकोसिसचे रोगाने बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 213 म्युकरमायकोसिस काळ्याबुरशीचे रुग्ण बरे झाले आहेत. तर 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा मोठा प्रादुर्भाव, आता पर्यंतराज्यात 130 रुग्णांचा मृत्यु.

काळ्या बुरशीचा धोका महाराष्ट्र राज्यात झपाट्याने वाढत आहे. म्युकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीच्या आजाराला नोटेफायबल डिसीज म्हणून आरोग्य विभागाने मान्यात दिली आहे. राज्यात म्युकरमाकोसिसच्या रुग्णांची नोंद पोर्टलवर करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांची चाचणी करण्यात येईल त्यांचे रिपोर्ट नोटिफिकेशनद्वारे कळवले जाणार आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन – बी (Amphotericin – b) या इंजेक्शनचा ताबाही आता राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने इंजेक्शनचे वाटप केल्यानंतर जिल्हाधिकारी या इंजेक्शवनचा साठा आपल्या ताब्यात घेतील आणि त्यानंतर जेवढी रुग्णसंख्या आहे त्या प्रमाणे इंजेक्शन देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर जी कारवाई केली होती त्यातून मिळालेल्या निधीचा वापर म्युकरमायकोसिसच्या जनजागृतीसाठी वापरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.