कोरोनाच्या संकटकाळात देवदूत म्हणून धाऊन येणाऱ्यांचे गजानन भोपये यांनी मानले आभार.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे असणारे राहवासी गजानन श्रावण भोपये यांना अनेक दिवसांपासून कोरोनाचीं लागण झाली होती. तसेच आज घडीला ते कोरोनावर मात करून सुखरूप घरी पोहोचले.
जेव्हा गजानन भोपये यांना कोरोनाने ग्रासले होते तेव्हा चुनाळा गावचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी त्यांचा घरी भेट देऊन त्यांना ग्रामीण हॉस्पिटल राजुरा मधे भरती केले. भरती केल्यानंतर माजी आमदार सुदर्शनजी निमकर आणि बाळूभाऊ यांनी त्यांना सकारात्मक विचार करण्याकरिता रोज प्रेरित केले तसेच माजी आमदार सुदर्शनजी निमकर आणि सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी डॉक्टर लांजेवार यांना संपर्क करून त्यांचे प्राण वाचवले व त्यांना पुनःजीवन दिले असे त्यांनी सांगितले. तसेच आज कोरोनावर मात करून सुखरूप घरी पोहोचन्याकरिता माजी आमदार सुदर्शनजी निमकर, सरपंच बाळनाथ वडस्कर तसेच गावतील हॉस्पिटल मधे नर्स म्हणून कार्यरत असलेली कु. सुप्रिया पायपरे यांनी त्यांना खुप सहकार्य केल्याबद्दल या सर्वांचे गजानन भोपये यांनी आभार मानले.