आरेचे मुख्य कार्यकारी अधिका-याच्या घरातून मिळाल कोरोडोचे घबाड, मुंबई एसीबीची कारवाई.

51

आरेचे मुख्य कार्यकारी अधिका-याच्या घरातून मिळाल कोरोडोचे घबाड, मुंबई एसीबीची कारवाई.

आरेचे मुख्य कार्यकारी अधिका-याच्या घरातून मिळाल कोरोडोचे घबाळ, मुंबई एसीबीची कारवाई.
आरेचे मुख्य कार्यकारी अधिका-याच्या घरातून मिळाल कोरोडोचे घबाळ, मुंबई एसीबीची कारवाई.

अभिजित सपकाळ, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.25 मे:- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घरावर छापा मारलाय. नथू राठोड यांच्या घरातून एसीबीकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आलीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल गुन्ह्यातील तपासाच्या अनुषंगाने यातील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यानंतर नथू राठोडच्या घरात 3 कोटी 46 लाख 10 हजार इतकी बेहिशेबी रोकड सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, नथू राठोड यांची कसून तपासणी केली जात आहे.