सोलापुरात रक्षकच बनला हैवान! पिढीत महिलेचा पती कोरोनामुळे रुग्णालयात दाखल संधी साधून पोलिसाने केला महीलेवर बलात्कार.

✒सोलापुर जिल्हा प्रतिनिधी✒
सोलापूर,दि.26 मे:- सोलापूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. ज्या पोलिसावर अत्याचार रोकण्याची जबाबदारी आहे जर तो अत्याचार करत रक्षकच बनत असेल हैवान तर?
सोलापुर एका पोलिसानेच महिलेचा बलात्कार केला असल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिलेचा पती कोरोनामुळे रुग्णालयात आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना 23 एप्रिलला घडली असून आरोपीचं नाव रवी मल्लिकार्जुन असं आहे. आरोपी हा पोलीस म्हणून कार्यरत आहे. तसेच संबंधित आरोपीची पीडित महिलेवर अनेक दिवसांपासून नजर होती. आरोपी महिलेला तो मेसेज करत होता. तसेच येता-जाता तिच्या खिडकीकडे बघून हसायचा, ओळख करण्याचा प्रयत्न देखील करायचा.
दरम्यान, पीडित महिलेचा पती कोरोना पाॅझिटिव्ह झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी अॅडमिट केलं असल्याचं आरोपीला माहिती होतं. याच संधीचा फायदा घेत आरोपी रात्री महिलेच्या घरी पोहोचला. महिलेने दार उघडताच आरोपीने घरात जाऊन दरवाजा बंद केला. यावेळी मला तु आवडते आणि माझं तुझ्यावर प्रेम असल्याचं आरोपीने महिलेला सांगितलं.
दरम्यान, महिलेने जर विरोध केला आणि आरडाओरडा केला तर तुझीच बदनामी होईल, असं सांगून आरोपी पोलीस तिची ओढाओढ करु लागला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणानंतर पीडित महिलेने आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.