शेत शिवार फुलू लागली, खरीप हंगामाच्या कामात शेतकरी व्यस्त.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर/कळमेश्वर,दि.26मे:- नागपूर जिल्हात आणि तालुक्यातील करोना वायरसच्या मोठा प्रादुर्भाव सुरु असुन. तर दुसरीकडे जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीला कामाची सुरुवात अंतीम टप्पात आली आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची नांगरणी, वखरणी करत आहे.
सध्या राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेतातील मशागत करणे पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यातील वादळामुळे तालुक्यातील दोन तीन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने त्यामुळे खरीप पेरणी च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मशागती मध्ये अडथळे निर्माण झाले होते. चार दिवस जिल्ह्यात पाऊस थांबला असून पगडी देऊन टाकले आहे. याचा फायदा घेत आता शेतकरी मशागतीमध्ये व्यस्त झाले आहेत. नागपुर जिल्ह्यातील खरिपामध्ये धानाचे पीक, कापूस, सोयाबीन, तुरी, भुईमुगाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच्यापाठोपाठ उडीद, मूग ज्वारी पीक घेतले जाते. प्रत्येक शेतकऱ्याला आधुनिक पद्धतीने शेती करणे शक्य नसल्याने एक कमी पैशांमध्ये पारंपारिक पद्धतीने शेतीची मशागत करत आहे. मशागतीसाठी लागणारे शेतकरी नवा हंगाम भरेल हीच सकारात्मक ऊर्जा घेऊन शेतकरी कामाला लागला आहे कशातच कोरोना वायरस प्रादुर्भावाचे भय शेतकरी बांधवाच्या मनात कायम आहे. शेतकरी मजूर मशागतीची कामे करताना मास्कचा वापर करताना व एकमेकांपासून अंतर राखून काम करताना दिसून येत आहे.