पोटच्या मुलानेच केली कोयत्याने जन्म देणा-या बापाची हत्या.

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड:- बीड जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या जन्मदेणा-या बापाची एका मुलाने हत्या केल्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आपल्या आईला बाप दारु पिऊन शिवीगाळ करत असल्याचा राग मुलाला सहन झाला नाही. त्यामुळे जन्मदात्या बापावर मुलाने कोयत्याने सपासप वार करून मुडदा पाडला असल्याची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेरच्या परिसरात घडली आहे. श्रीकिसन अंबादास तागड वय ६० वर्षे रा. पिंपळनेर तालुका बीड असं हत्या झालेल्या बापाचे नाव आहे नाव आहे. तर आरोपीचे नाव लहू श्रीकिसन तागड असं आहे.
श्रीकिसन यांना दारूचा नाद होता. दारू पिल्यानंतर घरी सतत वाद घालायचे. त्यामुळे घरचे सर्वजण श्रीकिसन यांच्या रोजच्या वादाला कांटाळले होते. त्यामुळे याचाच राग मूलाला होता. आणि शेवटी याच रागातून मुलगा लहू तागड याने वडील श्रीकिसन तागड शेतात एकटे असल्याचा फायदा घेत, त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्यांचा खून केला. मुलानेच जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली असून, श्रीकिसन यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपी मुलावर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.