मुंबई : काल भाजप शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर मराठी जनमानसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्या बद्दल प्रचंड संतापाची भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील साडेचार वर्षांपासून स्वबळ आणि स्वाभिमानाच्या बाता मारणारे उद्धव ठाकरे किती ठाम मताचे आहेत हेच यातून अधोरेखित झालं आहे. केवळ आगामी निवडणुकीत स्वतःची जास्त जागांची सुप्त इच्छा पूर्ण कारण्यासाठीच त्यांनी सामान्य मराठी मतदाराला अक्षरशः मूर्ख बनवलं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मराठी मताच्या जबर फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सत्ताकाळात डझनभर मंत्र्यांनी विकासाची काहीच कामं केली नाहीत म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हिंदुत्व आणि राम मंदिर असे भावनिक मुद्दे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेर काढले. परंतु, शिवसैनिकांकडून स्वबळाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच शपथ मोडून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्याचा देखील त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आधीच राज्याची राजधानी मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या ठाणे, मीरा-भायंदर शहरांमध्ये मराठी माणूसच अल्पसंख्यांक होण्याच्या दिशेने कूच करत आहे. हिंदी भाषिकांची संख्या इतकी प्रचंड वाढलेली दिसत आहे, की इथली राजकीय गणित देखील मराठी माणसाच्या मतांवर अवलंबून राहिलेली नाही. नेमकं तेच राजकीय वास्तव स्वीकारून मराठी माणसाची शिवसेना असा बोंबला करत खुलेआम उत्तर भारतीयांच्या सन्मानासाठी मुंबई-ठाणे सारख्या शहरात सज्ज झाली आहे. मुबईकर आणि हिंदुत्वाच्या आडून मुंबई-ठाण्यातल्या मराठी माणसाला शिवसेनेने कधी मूर्ख बनवलं याचा पत्ता त्याला स्वतःला सुद्धा अजून लागलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here