आमदार धर्मराव आत्राम यांना एटापल्ली येतील सुशिक्षित बेरोजगाराकडुन घेराव सुरजागड पहाडीवर सुरू असलेले काम बंद करण्याची मागणी.

53

मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातील स्थानिक बेरोजगारांना वगळून व सुरजागड आसपास असलेल्या गावातील बेरोजगारांना वगळून सध्या सुरजागड पाहाडीवर खनिज खोदकामाचे काम सुरू आहे त्रिवेणी नामक कंपनी हे काम करीत आहे याआधी सुरजागड प्रकल्पाबाबत सुनावणी घेण्यात आली होती ती लाॉयड मेटल या कंपनीमार्फत घेण्यात आले होते व त्यात जोपर्यंत तालुक्यातील सर्व बेरोजगारांना रोजगार तथा पिडित गावाचे पुनर्वसन व जंगल तथा पर्यावरणाचे नुकसान होणार नाही तसेच जोपर्यंत ह्य़ा समस्यांचे निराकरण होणार नाही तोपर्यंत काम सुरू करायचे नाही ह्य़ा विषयावर चर्चा करण्यात आली होती.

परंतु आता मात्र नवीनच कंपनी येऊन स्थानिकांना विश्वासात न घेता स्वताच्या मन मजींने व बळजबरीने कामाला सुरुवात केली आहे याद्वारे असे लक्षात येते सरळपणे शासन व कंपनी स्थानिक जनतेची दिशाभूल करीत आहे तरी महोदय महाराष्ट्र शासनाने तसेच केंद्र सरकारने स्थानिक ग्राम सभेला विशेष महत्त्व दिले असून तरी ग्रामसभेला विश्वासात न घेता व मंजुरी नसताना कामाला सुरुवात केली आहे तरी मोहदय या निवेदनाद्वारे आपणास विनंती आहे की जोपर्यंत स्थानिक जनता व ग्रामसभा यांची मंजुरी किंवा समाधान होत नाही तोपर्यंत चालू असलेला काम थांबविण्यात यावे आणि स्थानिक जनतेची जनसुनावणी घेऊन जर परवानगी असेल तरच कामाला सुरुवात करावी.

मा.धर्मरावबाबा आत्राम यानां एटापल्ली तालुका येथील बेरोजगारांनी घेराव करुन लाॅयड मेटल कंपनी मध्ये काम काम करणाऱ्या बेरोजगारांना प्रथम रोजगार उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आले यावेळी मा.धर्मराव बाबा यांनी पुर्वी ज्या बेरोजगारांनी सुरजाड येते यापुर्वी काम करीत असलेल्याना काम देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले तसेच सुरजागड आसपास असलेल्या गावातील सुक्षीतीत बेरोजगारांना रोजगार देण्यात येईल असे आश्वासन मा.आमदार बाबा आत्राम यांनी दिला.

यावेळी यावेळी नेहरू शेख अहेरी विधानसभा अध्यक्ष, कुंदन आसुटकर युवक तालुका उपाध्यक्ष, प्रसाद नामेवार युवक तालुका अध्यक्ष, तसेच मिथुन जोशी, उमेश उसेंडी, राकेश पुंगाटी, अक्षय पुंलीवार, रमेश मोहले, शरद कपाटे, मोतीराम कुंभारे उपस्थित होते.