सख्या भाऊ पैका वैरी, घराच्या वाटणी वरुन भावाने केली भावाची हत्या.

61

सख्या भाऊ पैका वैरी, घराच्या वाटणी वरुन भावाने केली भावाची हत्या.

सख्या भाऊ पैका वैरी, घराच्या वाटणी वरुन भावाने केली भावाची हत्या.
सख्या भाऊ पैका वैरी, घराच्या वाटणी वरुन भावाने केली भावाची हत्या.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
उल्हासनगर,दि.27 मे:- मुंबईच्या उपनगर उल्हासनगर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. घराच्या वाटणी वरुन सख्या भावाने मोठया भावाचा लोखंडी रॉडने वार करून हत्या केले. बुधवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ही हत्येची घटना घडली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-1 परिसरातील भीमनगर मध्ये विठ्ठल पांडुरंग कदम हे आई जनाबाई, पत्नी व मुलांसह राहतात. विठ्ठल कदम यांचा लहान भाऊ संतोष पांडुरंग कदम हा 19 मे रोजी घरी येऊन, आई जनाबाई हिच्या सोबत घराच्या वाटणीवरून भांडण सुरू केले. यावेळी विशाल याने वडील विठ्ठल पांडुरंग कदम यांना फोन करून घरी बोलावून घेतले. विठ्ठल यांनी भावाला समजावून सांगून त्याच्या घरी पाठविले. यावेळी तुम्हांला बघून घेईल अशी धमकी संतोष याने भाऊ विठ्ठल यांना दिली होती. मात्र घरातील किरकोळ भांडण असल्याने, विठ्ठल कदम यांनी दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री साडे दहा वाजता विठ्ठल कदम भीमनगर हिम्मत जेठानी चौकात काही कामानिमित्त गेले होते. यावेळी नशेत असलेल्या संतोष याने मोठ्या भावाला घर वाटणीच्या जाब विचारून लोखंडी पाईपने मारहाण केली.