वर्धा जिल्हात वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू.

63

वर्धा जिल्हात वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू.

वर्धा जिल्हात वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू.
वर्धा जिल्हात वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
वर्धा,दि.27 मे:- वर्धा जिल्हातील कारंजा तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारंजा तालुक्यातील राहटी शिवारातील जंगल बिट क्रमांक 53 मध्ये तेंदूपत्ता आणायला गेलेल्या एका व्यक्तीवर तीन वाघांनी हल्ला केला. यात इसमाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

नांदोरा येथील मुकुंद हिरामण ढोके वय 58 वर्ष हे पत्नी व मुलांसोबत जंगलात तेंदूपत्ता आणण्यासाठी गेले होते. वडील काही अंतरावर तेंदूपत्ता तोडायला गेले असता परत आलेच नाही. वडील आवाज देऊनही येत नसल्याने मुलाने गावातील नागरिकांना बोलावून आणले. जंगलात पाहणी केली असता तीन वाघ वडिलांना ओढत नेताना दिसले. यात मुकुंद ढोके यांचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन पोहोचून पंचनामा केला. यावेळी तातडीचे एक लाखाची मदत मृताच्या नातेवाइकांना वनविभागकडून देण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर यांनी सांगितले. वनविभागाचे कर्मचारी एल. एन. माहुरे, जी. बी. लखेकर, डब्लू. आर. ढोबाळे, डी. एन. खरबडे, पोलिस उपनिरीक्षक सचिन मानकर, पूनम गिरडकर, पोलिस जमादार किशोर कडू, हर्षवर्धन मुन, किशोर कापडे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थित होते.