नितीनजी गडकरी म्‍हणजे विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा: आ. सुधीर मुनगंटीवार

55

नितीनजी गडकरी म्‍हणजे विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा: आ. सुधीर मुनगंटीवार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त मुल येथे दोन रूग्‍ण्‍ावाहीका व २० हजार मास्‍क तर पोंभुर्णा येथे एक रूग्‍णवाहीका व १० हजार मास्‍कचे वितरण.

नितीनजी गडकरी म्‍हणजे विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा: आ. सुधीर मुनगंटीवार
नितीनजी गडकरी म्‍हणजे विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा: आ. सुधीर मुनगंटीवार

🖋मनोज खोब्रागडे🖋
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- नितीन गडकरी हे नांव उच्‍चारताच एक अलौकीक ऊर्जा मिळते, लोककार्यासाठी आगळे बळ मिळते. विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा म्‍हणजे नितीनजी गडकरी. काश्‍मीरपासून कन्‍याकुमारीपर्यंत अवघ्‍या भारताने त्‍यांच्‍या विकासाचा झंझावात अनुभवला आहे. कोरोना काळातही सर्वसामान्‍य जनतेने त्‍यांचे सेवाकार्य अनुभवले आहे. ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर असो रेमिडीसीवीर इंजेक्‍शन असो, एनआयव्‍ही, मोठे व्‍हेंटीलेटर अशा विविध आवश्‍यक उपकरणांचा पुरवठा करून त्‍यांनी जनतेला मोठी मदत केली आहे. विकासाची दुरदृष्‍टी लाभलेल्‍या या लोकनेत्‍याच्‍या निरामय दीर्घायुष्‍याची कामना करण्‍यासाठी त्‍यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त मुल येथे एक रूग्‍णवाहीका व शववाहीका तसेच पोंभुर्णा येथे एक रूग्‍णवाहीका आम्‍ही जनतेच्‍या सेवेत रूजु केली. कार्यकर्त्‍यांवर आभाळमाया करणा-या नितीनजींना निरंतर लोकसेवेसाठी दिर्घायुष्‍य लाभावे असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते नामदार नितीन गडकरी यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल येथे एक रूग्‍णवाहीका व एक शववाहीका तसेच २० हजार मास्‍कचे वितरण करण्‍यात आले. त्‍याचप्रमाणे पोंभुर्णा येथे एक रूग्‍णवाहीका व १० हजार मास्‍कचे वितरण करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, मुलच्‍या नगराध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर, उपनगराध्‍यक्ष नंदू रणदिवे, मुख्‍याधिकारी सिध्‍दार्थ मेश्राम, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ यांच्‍यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. पोंभुर्णा येथे पंचायत समितीचे सभापती अलका आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, श्‍वेता वनकर, रजिया कुरेशी, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, स्‍वप्‍ने बघताना आकाशाला गवसणी घालण्‍याची जिद्द व दुर्दम्‍य इच्‍छाशक्‍ती लाभलेल्‍या नितीनजींनी आमदार, मंत्री, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, केंद्रीय मंत्री अशा सर्वच पदांना प्रभावीपणे न्‍याय दिला आहे. विकासाबाबत आम्‍ही जेव्‍हा जेव्‍हा त्‍यांच्‍याकडे मागणी केली तेव्‍हा तेव्‍हा ती त्‍यांनी प्राधान्‍याने पूर्ण केली. त्‍यांच्‍या सहकार्याने आम्‍ही जिल्‍हयात ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, एनआयव्‍ही, मोठे व्‍हेंटीलेटर, मिनी व्‍हेंटीलेटर, रूग्‍णवाहीकांचे वितरण केले. सर्वसामान्‍य जनतेला मदत करण्‍यासाठी कायम तत्‍पर असलेल्‍या या लोकनेत्‍याचा आदर्श समोर ठेवून आम्‍ही सतत कार्यरत राहू, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.