वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभीयांत्रिकी महाविद्यालयाचे माझी प्राचार्य डॉ. अशोक कडाळे याचे निधन.

55

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभीयांत्रिकी महाविद्यालयाचे माझी प्राचार्य डॉ. अशोक कडाळे याचे निधन.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभीयांत्रिकी महाविद्यालयाचे माझी प्राचार्य डॉ. अशोक कडाळे याचे निधन.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभीयांत्रिकी महाविद्यालयाचे माझी प्राचार्य डॉ. अशोक कडाळे याचे निधन.

प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्ह्य प्रतिनिधी
बीड:- आजची सकाळ अशी काही मनाला चटका देणारी बातमी घेवून येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आज दिनांक 28 रोजी डॉ. अशोक श्रीधरराव कडाळे यांच्या दुःखद निधनाची बातमी कळाली आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण ते व्यक्तिमत्वच तसे आदरणीय होते. येथे प्रत्येकजण या बातमीने हळहळला.

डॉ. अशोक श्रीधरराव कडाळे यांनी माजी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, विद्यापीठ अभियंता, विभागप्रमुख मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग या पदावर कार्य केलेले असून सध्या ते विभागप्रमुख कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी महाविद्यालय परभणी तथा मुख्य शास्त्रज्ञ पाणी व्यवस्थापन योजना या पदांवर कार्यरत होते.

डॉ. कडाळे यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकास कामात फार मोठे योगदान दिले. त्यांनी विद्यापीठ मुल्यांकनाच्या कामामध्ये कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर घटक महाविद्यालयांच्या मुल्यांकन कामामध्ये विद्यापीठ अभियंता या पदावर असतांना केलेले काम आदर्शवत आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामामुळे महाविद्यालयांना मुल्यांकनामध्ये उच्च श्रेणी प्राप्त झाली आहे. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मृद व जलसंधारण विभागा अंतर्गत त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील दोन संशोधन प्रकल्प पूर्णत्वास नेले होते. पाणलोट क्षेत्र विकास व्यवस्थापन या विषयात त्यांनी संशोधन करून शिफारशी देऊन विभागाचे नाव, महाविद्यालयाचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम आचार्य पदवी स्नातक त्यांच्या मार्गदर्शना मुळे पदवीधारक झाला. त्यांचे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात फार मोलाचे कार्य आहे.

डॉ. कडाळे सर हे उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपली आचार्य पदवी लुधियाना विद्यापीठातून पूर्ण केली होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तर ते प्रचलित होतेच पण तसेच सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी सगळ्यांशी एक वेगळेच अजोड नाते जोडले होते. त्यांना अधुनिक युगातील श्रावण म्हणावे लागेल कारण त्यांनी त्यांच्या आई – वडिलांची सेवा अखेरपर्यंत सेवाभावनेनी केली. आणि दहा दिवसांच्या अंतराने आई – वडिलांच्या दुःखद निधना नंतर हे सुद्धा त्यांच्या मागेच तिथेही सेवा करायला गेले की काय असेच वाटते. असे हे श्रावण.यांच्या दुःखद निधनामुळे कृषी अभियांत्रिकी विद्या शाखेच्या प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांचे फार मोठे न भरून येणारे नुकसान झालेले आहे. विद्यापीठ परिवारात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून न येण्या सारखी आहे.

डॉ. कडाळे सरांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या दुःखातुन सावरण्याचे बळ त्यांना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आमचा विद्यापीठ परिवार त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. डॉ. कडाळे सर हे सगळ्यांचे आदर्श होते. आणि असे आदर्श व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. सर तुम्हाला शतशः प्रणाम तुमच्या आठवणीत सदैव आम्ही. तुमच्या साठी ऐवढेच म्हणावे वाटते. अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवूनी जाती! भावपूर्ण श्रद्धांजली.