पत्नीला सॅनिटायझर पाजुन, जीवानीशी ठार मारण्याचा प्रयन्त.

49

पत्नीला सॅनिटायझर पाजुन, जीवानीशी ठार मारण्याचा प्रयन्त.

पत्नीला सॅनिटायझर पाजुन, जीवानीशी ठार मारण्याचा प्रयन्त.
पत्नीला सॅनिटायझर पाजुन, जीवानीशी ठार मारण्याचा प्रयन्त.

✒MVN क्राईम रिपोर्टर✒
नांदेड,दि.29 मे:- नांदेड जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवरा बायकोच्या झालेल्या भांडणानंतर पतीने गळा दाबून पत्नीला जबरदस्तीने सॅनिटायझर पाजले. ही घटना निजामाबादच्या बुुरुड गल्ली येथे घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीविराेधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. पायलकौर गुरनामसिंग जमदार या विवाहितेचे सासर बुरुड गल्ली येथे आहे. 22 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पती गुरनामसिंग याच्यासोबत तिचे भांडण झाले होते. याच भांडणातून गुरनामसिंग याने पायलकौर यांचा एका हाताने गळा दाबून दुसऱ्या हाताने त्यांना जबरदस्तीने सॅनिटायझर पाजले. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नांदेडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 25 मे रोजी त्यांना शुद्ध आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून गुरनामसिंग याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर, निजामाबाद येथे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.