पाचोऱ्यात विना रजि. लॅब विना परवानगी बिनधास्त सुरु, वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष त्यामुळे वीमा धारकांना घरघर.

✒ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी✒
पाचोरा/जळगाव:- सध्या देशात आणि राज्यात सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. रोज हजारो कोरोना वायरस बाधित रुग्णांचा मृत्यु होत आहे. तर दुसरीकडे विमा कंपन्यांना मोठया प्रमाणावर क्लेम द्यावा लागत असल्यामुळे रुग्णांची फाईल किरकोळ त्रुटीमुळे परतावा देण्यात टाळाटाळ करत आहे.
यामध्ये भरमसाठ फी घेऊन रक्त, लघवी इ. तपासणी करणाऱ्या पॅथोलॉजी लॅब धरकांचे आता अधिकृत लॅब नोंदणी प्रमाणपत्र विमा कंपन्यांनी तपासणे सुरु केल्याने फक्त तेवढयाच कारणाने आता क्लेम रिजेक्ट केला जातच आहे शिवाय यापुर्वी ज्यांना क्लेमची रक्कम अदा करण्यात आली आहे त्याची देखील पडताळणी होणार आहे हीच त्रुटी व निकष आता शासकीय-निमशासकीय कार्यालयालयातील मेडीकल फार्ईली बाबतही लावण्यात येणार असल्याचे समजते तरी ही गंभीर बाब लक्षात घेता संबधित शासकीय विभागाने अशा नोंदणी प्रमाण पत्राची व सक्षम डिग्रीची लॅब धारकांची तपासणी मोहीम हाती घेऊन रुग्णांची लुट थांबवावी.
तसेच ज्यापण हॉस्पीटलला रुग्ण दाखल करणार असाल त्या हॉस्पीटल मधुन क्लेम फाईल तातडीने मिळेत असेल तरच आपला रुग्ण त्या हॉस्पीटलला दाखल करा हे विशेष शिवाय आपला रुग्ण ज्या हॉस्पीटल मध्ये दाखल करणार असाल त्या रुग्णालया मधील लॅबधारक सक्षम पदवीधर आणि सक्षम शासकीय कार्यालयात नोंदणीकृत आहे का? याची देखील पडताळणी केल्यानंतरच बिल अदा करावे असे आव्हान मिडिया वार्ता न्युजच्या वतीने करण्यात येत आहे.