आई कडुन आपल्या दीड वर्षाच्या मुलाला हिसकावून आणल, मग दिली फासी.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
बुलढाणा:- बुलढाणा जिल्हातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्हातील काळीज हेलावून टाकले आहे. एका बापाने आपल्या दिड वर्षाचा मुलाला सासरवाडी गेलेल्या आईकडुन हिसकावुन आपल्याकडे आणलं. त्यानंतर केवळ दीड वर्षाचा असलेल्या आपल्या पोटच्या चिमुकलयाला फासावर लटकवून त्याला संपवलं. एवढंच नाही तर यानंतर संबंधित बापाने पण स्वताःही आत्महत्या केली.
बुलडाणा येथील कुंदेगाव येथे रहिवासी असणाऱ्या एका तरुणाचे संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथील एका तरुणीसोबत लग्न झालं होत. संबंधित पतीचं नाव दिनेश असं आहे. या दोघांना काही काळानंतर एक मुलगा देखील झाला. मात्र काही दिवसांनंतर यांच्या संसारात क्षुल्लक कारणांवरुन सतत खटके उडू लागले. सततच्या भांडणांना वैतागून संबंधित पत्नी मुलाला घेऊन तिच्या माहेरी गेली.
27 मे रोजी दिनेश आपल्या सासरवाडीत गेला आणि तिथून आपल्या मुलाला घेऊन घरी आला. त्याच रात्री दिनेशने आपल्या पोटच्या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाला फासवर लटकवलं. एवढच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर दिनेशने देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे.