जालना पोलिस युवक शिवराज नारियलवले मारहाण केल्याप्रकरणी सतिश म्हस्के व भाई सुधाकर निकाळजे मुळे मिळाला न्याय.

सतिश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी
जालना:- भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवराज नारियलवले यांना काठी तुठे पर्यंत मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. हा प्रकार जनता दरबार सामाजिक संघटना संस्थापक सचिव सतिश म्हस्के व भिम शक्ति सामाजिक संघटनाचे सुधाकर भाई निकाळजे यांनी उचलून धरत दोषी पोलिसांनविरुध तात्काळ कार्यवाहीची मागणी केली होती. जालना पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी शहरात पुन्हा आशी घटना घडू नये म्हणून यांनी चौकशी करून दोषी पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची नावे पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळके, महेद्र भारसाकळे यांच्या निलंबित करण्यात आले असून तसेच पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल पोलिस महानिरीक्षक सुपूर्त करण्यात आला असून त्याच्यावर ही कारवाई होणार असल्याची शक्यता आहे.