विश्वशांती सामाजिक संस्थेच्या वतीने “कोविड-19 योद्धा” म्हणून एफ/दक्षिण मोटर लोडर कामगारांचा गौरव.

🖋गुणवंत कांबळे, प्रतिनिधी🖋
परळ :- विश्वशांती सामाजिक संस्थेचे संस्थापक कामगार नेते कालकथित डी.एस.कांबळे यांच्या 4 था स्मृति दिनानिमित्त कोरोनाच्या महामारीत मुंबईची परिस्थिती हाताबाहेर न जाऊ देणारे “कोविड योध्दे” म्हणजे अत्यावश्यक महानगरपालिकातील सेवेतील कामगार आहेत.
एफ/दक्षिण विभाग,मोटर लोडरचौकीवरील कामगारांना संस्थेच्या माध्यमातून त्यांना सॅनिटाईझर, हाथ धुण्यासाठी साबण, मास्क, पॅरासिटीमॉल गोळ्यांचे पाकीट, गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे, सेक्रेटरी कमलेश साळकर, उपाध्यक्ष प्रसनजीत कांबळे, संस्थेच्या उपसमितीचे अध्यक्ष संदीप मोहिते, संस्थेचे सदस्य बबन चंदनशिवे, ज़ैन समाजाचे नेते अरुण चोप्रा, तसेच म्युनिसिपल मजदूर युनियन एफ/दक्षिण वार्ड अध्यक्ष जनार्दन कांबळे, म्यु.म.यु.एफ दक्षिण वार्ड संघटक विजय कांबळे, मुंबई महानगरपालिका एफ/दक्षिण विभाग घनकचरा व्यवस्थापनचे मोटर लोडर चौकीचे कनिष्ठ अवेक्षक प्रकाश पवार सर, कनिष्ठ अवेक्षक श्रीकांत कुडकर सर, मुकादम, कामगार कर्मचारी व कंत्राटी कामगार आदी सर्व उपस्थित होते.