लाच म्हणून माघीतली दारू आणि मटणाची पार्टी ताव मारताना एसीबी ची धाड.

51

लाच म्हणून माघीतली दारू आणि मटणाची पार्टी ताव मारताना एसीबी ची धाड.

लाच म्हणून माघीतली दारू आणि मटणाची पार्टी ताव मारताना एसीबी ची धाड.
लाच म्हणूलाच म्हणून माघीतली दारू आणि मटणाची पार्टी ताव मारताना एसीबी ची धाड.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चिफ✒
बुलढाणा, 30 मे:- बुलढाणा जिल्हातील खामगाव तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचा-या मध्ये भ्रष्टाचार किती पसरला आहे यांची माहिती पुढे आली. फ्लॅटची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी मंडल अधिकारी आणि तलाठ्याने दारू आणि मटणाची पार्टी लाच म्हणून माघाल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या शेतात दारू आणि मटणावर ताव मारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून संबंधित दोन्ही भष्ट्राचारी अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार भष्ट्राचारी लाखनवाडयाचा मंडल अधिकारी विलास साहेबराव खेडेकर वय 52 वर्ष राह. गजानन कॉलोनी खामगाव आणि शिरला नेमानेचा तलाठी बाबूराव उखर्डा मोरे वय 36 वर्ष राह. किन्ही महादेव तालुका खामगाव या लाचखोर फ्लॅटची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतली आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीला चक्क दारू आणि मटणाची पार्टी देण्यास सांगितलं. या घटनेची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळाल्यानंतर त्यानी सापळा रचून दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री घनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतात ही कारवाई केली आहे.

विशेष म्हणजे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दोन दारुच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठ्याने यापूर्वी आणखी किती जणांना अशाप्रकारे लुटलं आहे. याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.