मिडिया वाताँ न्यूज :- ठाणे म्हणजे घनदाट बोरीवली नॅशनल पार्कच्या लगत असलेले शहर आणि याचा प्रत्यय वारंवार येत असतो… आज ही अशीच काहीशी घटना घडली… शांत, निसर्गरम्य आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शुद्ध हवे करता अनेक ठाणेकर येऊरच्या मुख्यरस्त्यावर माॅर्निंग वाॅकला जातात… मात्र आज नेहमी प्रमाणे माॅर्निंग वाॅकला गेलेल्या ठाणेकरांना एक सुखद धक्काच मिळाला…. काही ठाणेकर येऊर मधील एअरफोर्स बेस जवळ पोहचले तेव्हा त्यांना बिबट्याने डरकाळी फोडल्या सारखा आवाज आला लगेच त्यांनी वन विभागाला कळवले तेव्हा शोधा शोध केली असता नुकतच म्हणजे २ दिवसांपुर्वी जन्मलेलं बिबट्याचे पिल्लू जीवाच्या आकांताने ओरडते होते.

पण त्याचा चिमकला आवाज ऐकून कोणी पुढे जायला तयार नव्हते कारण त्या बछड्याची आई जवळपासच कुठे असायची शेवटी आजूबाजूला कोणीच नाही याची खात्री पटल्यावर वन विभागाने त्या बछड्याला अलगद उचलले आणि तो बछडा शांत पण खेळू लागला…

मग काय ठाणेकरही त्या बछड्या सोबत आनंदी होऊन त्या बछड्या सोबत फोटो काढू लागले आणि काही क्षणात तो बिबट्याचा बछडा सेलिब्रिटी झाला…

पण नुकताच जन्मलेला असल्याने नीट पायावर उभं राहता येत नसल्याने त्या बछड्याची वन विभागाने बोरीवली नॅशनल पार्क येथे असलेल्या प्राण्याच्या इस्पितळात रवानगी केलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here