कोरोना बाधित रुग्ण का बरा होत नाही’; जालन्यातील नवजीवन रुग्णालयात नातेवाईकांनी केली तोडफोड.

कोरोना बाधित रुग्ण का सुधारत नाही'; जालन्यातील नवजीवन रुग्णालयात नातेवाईकांनी केली तोडफोड.
कोरोना बाधित रुग्ण का सुधारत नाही’; जालन्यातील नवजीवन रुग्णालयात नातेवाईकांनी केली तोडफोड.

✒सतिश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी✒
जालना,दि.31 मे:- जालना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात असलेल्या नवजीवन रुग्णालयात कोरोना वायरस बाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. यात नवजीवन रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे कोरोना वायरस बाधित रुग्ण ऑक्सिजनवर असलेल्या सहा रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे. कोरोना वायरस बाधित एक रुग्ण गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. असे असतानाही त्यांची तब्येत का सुधारत नाही, असा सवाल करून तिघांनी मेडिकल, तसेच रुग्णालयाच्या काचा फोडल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले; परंतु तोपर्यंत दगडफेक करणारे संतप्त नातेवाईक पसार झाले होते. या प्रकरणी रविवारी रात्री पोलीसांनी गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here