रक्‍तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासा: राखी कंचर्लावार
रक्‍तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासा: राखी कंचर्लावार

रक्‍तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासा: राखी कंचर्लावार

मोदी सरकारच्‍या सप्‍त वर्षपुर्तीचे औचित्‍य आ. मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे रक्‍तदान शिबीराचा शुभारंभ

रक्‍तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासा: राखी कंचर्लावार
रक्‍तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासा: राखी कंचर्लावार

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- कोरोनाच्‍या संकटामध्‍ये रक्‍ताची गरज असणा-या रूग्‍णांची हेळसांड होत आहे. त्‍यातच आपल्‍या जिल्‍हयाची स्थिती आणखी गंभीर आहे. या जिल्‍हयात सिकलसेल व थॅलेसेमीया चे रूग्‍ण असल्‍याने ही गंभीर स्थिती आहे. या रूग्‍णांना रक्‍ताशिवाय दुसरा पर्याय नाही. कोरोनाच्‍या संकटात रक्‍तदात्‍यांची संख्‍या कमी झाल्‍याने हे रूग्‍ण रक्‍तासाठी भटकत आहेत. त्‍यामुळे नागरिकांनी रक्‍तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासावी असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले. त्‍या आय.एम.ए. सभागृह येथे मोदी सरकारच्‍या सप्‍तवर्षीपुर्तीनिमीत्‍त आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे आयोजित रक्‍तदान शिबीराच्‍या शुभारंभप्रसंगी रविवार (३० मे) ला कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्ष म्‍हणून बोलत होत्‍या. यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणून भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रवि आसवानी, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचे राजेंद्र गांधी, सुभाष कासनागोट्टूवार, रविंद्र गुरनुले, प्रकाश धारणे, संजय कंचर्लावार, भाजपा मंडळ अध्‍यक्ष सचिन कोतपल्‍लीवार, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, रामकुमार अकापेल्‍लीवार, स्‍वेच्‍छा रक्‍तदान शिबीर प्रकल्‍प संयोजक प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. याप्रसंगी प्रकाश धारणे, शुभम शेगमवार, विवेक कुलकर्णी, कमलेश नंदनवार, वैष्‍णवी अडावदकर यांनी रक्‍तदान केले.

कंचर्लावार म्‍हणाल्‍या, रक्‍तदानामुळे आपण अनेकांचा जीव वाचवू शकतो. मानवी शरीरातच रक्‍त तयार होत असल्‍याने नागरिकांनी जागरूकपणे रक्‍तदान केले पाहीजे. याप्रसंगी डॉ. गुलवाडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व विषद करीत हे शिबीर पुढील ३० दिवस अविरत सुरू ठेवण्‍याचे जाहीर केले. मागील वर्षी महानगरातील विविध संघटनांनी या सेवायज्ञात सहभाग नोंदविला होता, असेही ते म्‍हणाले.यावेळी रक्तदात्यांना आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वतीने रक्तदात्यांना कोरोना कवच म्हणून फेसशील्ड,N 95 मास्क,सॅनेटायझर व बिस्कीट प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात सुभाष कासनागोट्टूवार यांनी आयोजनामागचा उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी केले तर आकापेल्‍लीवार यांनी आभार मानले. रक्‍त संकलनासाठी जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयातील डॉ. मृदुल खोब्रागडे व समाजसेवा अधिक्षक पंकज पवार यांच्‍या चमूने महत्‍वाची भूमीका बजाविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here