रा.काॅ. अल्पसंख्यांक काटोल विधानसभा अध्यक्षपदी सोहेल शेखची निवड.

🖋युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी🖋
मोवाड, ता.1;- येथील सर्वधर्मसमभाव हे तत्व मानणारे मनमीळाऊ स्वभावाचे तसेच राष्र्टवादी काॅंग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते सोहेल सत्तार शेख यांची रा.काॅं. अल्पसंख्याक विभाग नागपूर जिल्हा ( ग्रामीण ) कार्यकारीणी काटोल विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नूकतीच निवड करण्यात आली. ही निवड पक्षाचे मुख्य कार्यकर्ते सलील देशमुख, आमदार प्रकाश गजभीये यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नागपुर जिल्हा अध्यक्ष शोयब असद यांनी सोहेल शेखला नियुक्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
सोहेलच्या निवडीबद्दल मोवाड येथील न.प. चे माजी नगराध्यक्ष तथा राष्र्टवादी गटनेते अनील साठोणे, लक्ष्मीनारायण निमकर, अकबर पटेल, वकील शेख, विवेक लीखार, नसीर सिद्दीकी, नईम शेख, असलम पठाण, रवी भंदीर्गे, विजय बिलगैये, जावेद दिवाण, आरीफ शेख, संजय करीये, आहाद सिद्दीकी, नजीर शेख, सादीक शेख आदींनी अभिनंदन केले.