ब्रम्हपुरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरन करण्या संदर्भात विजय भाऊ वडेट्टीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट

✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणेबाबत काल केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेतली.
ब्रम्हपुरी शहरातून नागपूर – उमरेड – नागभिड – ब्रम्हपुरी – आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ डी , तसेच ब्रम्हपुरी – वडसा – कुरखेडा- कोरची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ जातात .
त्यापैकी रा. मा. क्र. ५४३ सी २.५० किमी लांबी व रा. मा. क्र. ३५३ डी ची ४ किमी लांबी ही ब्रम्हपुरी शहराच्या रहिवासी क्षेत्रातून जातात.
ब्रम्हपुरी शहर ही मोठी बाजारपेठ असून शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे, तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा हा तालुका आहे. शहराचा हा भाग वर्दळीचा असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी शहरातून जाणाऱ्या या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करणे आवश्यक आहे.