परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि. 02 व 03 जून रोजी लसीकरणाची विशेष सुविधा.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण वैदयकीय आरोग्य विभाग तर्फे आवाहन

✒️अभिजित सपकाळ, मुंबई प्रतिनिधी✒️
कल्याण डोंबिवली,दि.2 जुन:- कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांकरिता स्वतंत्र कोविशिल्ड लसीकरणाची सोय उदया दि.02/06/2021 आणि दि. 03/06/2021 रोजी आर्ट गॅलरी, लालचौकी कोविड लसीकरण केंद्र कल्याण (प.) येथे सकाळी 10.00 वाजेपासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. परदेशात शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विदयार्थ्यांनी कोविशिल्ड लसीकरणासाठी येताना
1). शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/वोटर आयडी/पासपोर्ट ,यापैकी एक)
2). कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पुरावा (ॲड्रेस प्रुफ)
3). l 20 फॉर्म अथवा DS 160 फॉर्म अथवा प्रवेश निश्चित झाल्याचे परदेशी विदयापीठाचे/ शिक्षण संस्थेचे पत्र यापैकी एक
वरील नमुद केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी लसीकरण केंद्रावर आणावयाची आहेत. झेरॉक्स प्रती लसीकरण क्रेंदावर जमा करुन घेतल्या जातील याची नोंद घ्यावी. तरी महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येते की परदेशी शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या पात्र विदयार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा.
महापालिकेत लस उपलब्ध न झाल्यामुळे परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर सर्व नागरिकांना आणि इतर सर्व केंद्रांवर उद्या लसीकरण बंद राहील.