मुंबईकरानी हिरोपंती बंद करावी; मुंबई पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई:- राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना वायरस बाधित रुग्णांची संख्या कमी होतानाचा आलेख असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहर कोरोनामुक्त होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. याचा फायदा घेऊन काही जण विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री दिशा पटनी आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांविरुद्ध वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना महामारी अर्थात साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम १८८, ३४ IPC दिनांक २ जून २०२१ नुसार या गुन्ह्याची नोंद केली आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी हे बांद्रा येथे आपले जिम पूर्ण केल्यानंतर ड्राईव्हसाठी गेले होते. त्याचवेळी बांद्रा येथील बँडस्टँड पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचे आधार कार्ड, लायसन्स आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. यानंतर त्या दोघांसह ड्रायवर असे त्या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी या दोघांना लॉकडाऊन असतानाही फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणे चांगलेच महागात पडले आहे.