जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल*

57

*जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल*
जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल*

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961

अकोला,दि.३ (जिमाका)- जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्याचा एक भाग म्हणून चार नव्या रुग्ण वाहिका दाखल झाल्या आहेत. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. नितीन देशमुख, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी आणखी रुग्णवाहिका लवकरच दाखल होतील,असा विश्वास ना. कडू यांनी यावेळी व्यक्त केला.