बहिणीला नवरा देत होता सतत त्रास, बहिणीच्या नवऱ्याची मेहुण्याने केली हत्या.

✒️भंडारा, जिल्हा प्रतिनिधी✒️
भंडारा,दि.5 जुन:- भंडारा जिल्हातुन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीला जावई सतत देत असल्याच्या कारणामुळे मेहुण्याने जावयाचा मुर्दा पाडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

आपल्या बहिणीला तिचा नवरा मोठ्या प्रमाणात सतत त्रास देणाऱ्या जावयाचा मेहुण्याने धारदार शस्त्राने खून केला आहे. हि घटना शुक्रवारी मध्यरात्री कस्तुरबा वार्डामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहुण्याला अटक केली आहे.

हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मंगल अमर मोगरे असे आहे. तर आरोपी मेहुण्याचे नाव सुशील संजू संदेश असे आहे. मंगल मोगरे हा आपल्या पत्नीला सतत मारहाण करुन त्रास देत होता. मंगल याच्या पत्नीने हा सर्व होणारा त्रास आपल्या भावाला सुशील याला सांगितले. यानंतर सुशीलने अनेकदा मंगलची समजूत काढली. पण त्याने त्रास देणे सुरूच ठेवले. शुक्रवारी रात्री मंगल घरी एकटा असताना सुशील त्याच्या घरी गेला त्यानंतर मंगलला काही कळायच्या आत सुशीलने त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

या हत्येची माहिती घरा शेजारच्या लोकांना समजताच त्यांनी मंगलला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत आरोपी तिकडून पसार झाला होता. यानंतर पोलिसांनी शनिवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले. आणि तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here