धरतीधन सोयाबीन बियाण्याची कंपनी उठली शेतक-यांच्या जीवावर, गुन्हा दाखल, 4 कोटी 30 लाख रुपयांचे बियाणे जप्त.
धरतीधन सोयाबीन बियाण्याची कंपनी उठली शेतक-यांच्या जीवावर, गुन्हा दाखल, 4 कोटी 30 लाख रुपयांचे बियाणे जप्त.

धरतीधन सोयाबीन बियाण्याची कंपनी उठली शेतक-यांच्या जीवावर, गुन्हा दाखल, 4 कोटी 30 लाख रुपयांचे बियाणे जप्त.

विदर्भात अशा किती बोगस कंपनीया आहे?

बियाण्याची कंपनी उठली शेतक-यांच्या जीवावर,
धरतीधन सोयाबीन बियाण्याची कंपनी उठली शेतक-यांच्या जीवावर, गुन्हा दाखल, 4 कोटी 30 लाख रुपयांचे बियाणे जप्त.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
यवतमाळ,दि.5 जुन:- यवतमाळ जिल्हातील दारव्हा तालुक्यातील बोरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पाश्वभुमीवर शेतक-यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील प्रसिध्द कृषी बियाणे धरतीधन सिड्स व प्रोसेसिंग प्लांटच्या संचालकाने शासनाची दिशाभूल व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. संजय सोहनलाल मालानी वय 54 वर्ष रा. बोरी, जिल्हा यवतमाळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याचबरोबर 4 कोटी 20 लाख रुपयांचा कृषी बियाण्याचा माल जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या तीन पथकाने ही कारवाई केली.

यवतमाळ मार्गावर बोरी येथील ही बियाणे कंपनी आहे. सदर कंपनीला कृषी आयुक्तालयाकडून बियाणे विक्रीसाठी तसेच राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा अकोला यांच्याकडून बीज प्रक्रिया केंद्राचा परवाना प्राप्त झालेला आहे. परंतु, याठिकाणी बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यादृष्टीने तपासणीसाठी कृषी विभागाच्या पुणे, अमरावती, यवतमाळ, दारव्हा येथील अधिकाऱ्यांनी शुक्रवार ता 4 जूनला दुपारी या कंपनीत धडक दिली. त्यावेळी कंपनीच्या प्लांटमध्ये सोयाबीन बियाणे चाळणी लावून प्रति बॅग 30 किलो प्रमाणे बॅगींग करीत असल्याचे निदर्शनास आले. बॅगवर उत्पादक प्रक्रिया व विपणन व बियाण्याच्या गुणवत्तेबाबत जबाबदार कंपनीचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक यासारख्या कोणत्याही बाबीचा उल्लेख नाही. बॅगवर प्रमाणित बीज असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच बॅगवर बियाणे कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक असलेल्या बाबीचा उल्लेख नाही. तसेच प्रमाणित बियाणे संदर्भात उपलब्ध साठा व केलेली विक्री त्याबाबतची देयके यासंदर्भात कोणताही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. शिवाय सत्यता दर्शक बियाणेबाबत बीजोत्पादनासाठी वापरलेले उगम बियाणे, खरेदीची पावती, शेतकऱ्यांची यादी, त्यापासून उत्पादित झालेले एकूण बियाणे यामधून विक्रीयोग्य शुद्ध बियाणे, गुणवत्ता तपासणीचा प्रयोगशाळेचा अहवाल, वीज उत्पादक शेतकऱ्यांना बियाण्यापोटी अदा केलेली रक्कम या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही.

सोयाबीनचा 152.70 क्विंटल साठा आणि तुरीचे 4960 कीलोचे पॅक बियाणे आढळून आले. याशिवाय सदर कंपनीच्या गोडाउनमध्ये सोयाबीनचे बियाणे असलेल्या पोत्यात भरले असल्याचे आढळून आले. कंपनीच्या परिसरात एका ट्रकमध्ये 250 पोते सोयाबीन असल्याचे निदर्शनास आले. तसेच गोडाउन मध्ये विविध कंपनीच्या बियाणे भरलेल्या व काही रिकाम्या पिशव्या देखील निदर्शनास आल्या. पोत्यात अंदाजे 1729 क्विंटल तूर तसेच 660 क्विंटल सोयाबीन व दोन हजार 700 क्विंटल हरभरा होता. सदर सर्व बियाण्याची किंमत चार कोटी 19 लाख 93 हजार रुपये आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार कृषी अधिकारी शेखर थोरात आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे यांनी दिली. त्यावरून कंपनीचे मालक संजय मालानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार यशवंत बाविस्कर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here