आर.एस.आर मोहता मिल चालू ठेवा: डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.

61

आर.एस.आर मोहता मिल चालू ठेवा: डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.

आर.एस.आर मोहता मिल चालू ठेवा: डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.
आर.एस.आर मोहता मिल चालू ठेवा: डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.

✒️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒️
हिंगणघाट,दि.7 जुन:- हिंगणघाट शहरातील आर.एस.आर मोहता मिल हे फार जुनी मिल असुन कोणती ही पूर्व सुचना न देता मिल मालकाने मिलच्या गेट वर नोटीस लावला की मिल बंद करण्यात येते आहे.

हिंगणघाट मधिल हजारो कामगार आणि त्यांचा परिवाराला उदरनिर्वाहचे मुख्य साधन आहे. मिल बंद झाला मुळे 570 कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करनार हा प्रश्न कामगारांच्या मनात निर्माण झाला असुन त्यांची मानसीकता खराब झाली आहे.

आर.एस.आर मोहता मिल चालू ठेवा: डाॅ. उमेश वावरे यांची मागणी.

135 वर्षे जुना मिल असुन यावर हिंगणघाट शहराचा उदरनिर्वाह चालत होता. अचानक मिल बंद पडला .रोजगाराच्या प्रश्नन निर्माण झाला. मिल मालकाने मिल चालवता येत नसेल तर हा मिल शासनाने चालवावा तस जर शक्य नसेल तर कामगाराना वि.आर.एस नुसार रक्कम अदा करावी व सोबत 10 लाख रूपये अतिरिक मदत कामगारांना करावी तर मिल बंद करावा. अशी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ. उमेश वावरे यांनी उद्ववरावजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, हसन मुश्रिफ कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी वर्धा जिल्हा, उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

त्या प्रसंगी दिलिपभाऊ कहूरके, मनिष कांबळे, देवेंद्र त्रिपल्लीवार, अरूण काळे, विलास डोबळे, उल्हास पिपळशेंडे, अनिल तादूळकर, देवेंद्र साखरकर, रवी मोळकरवार, एकनाथ डेकाडे, शेखर दरबेशवार, प्रशांत धोटे, हनुमान यादव, रवी खोडसेलवार, विजय फूलझले, नितिन मैदलकर संपूर्ण मिल कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.