स्वतःच नाक मोठ करून मोदी सरकारच्या कामकाजाची खोटी बढाई मारताना दिसतात: विजय वडेट्टीवार

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ७० रुपयांच पेट्रोल पंतप्रधान १०६ रुपयाने देशातील जनतेला विकत असताना भाजपचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःच नाक मोठ करून मोदी सरकारच्या कामकाजाची खोटी बढाई मारताना दिसतात.
खोटं बोल पण रेटून रेटून बोल हे एकच काम भाजप नेते आणि पंतप्रधान प्राविण्याने करत आहे.
महागाई वाढवण्यात आणि खोटं बोलण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रन रेट फास्ट आहे.
शतक गाठलेल्या पेट्रोल दरवाढ विरोधात आज आरमोरी येथे पेट्रोल पंपावर काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माझ्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.श्री.नानाभाऊ पटोले व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.