*पहिल्या पावसात जालना थ्री स्टार मान्यता प्राप्त नगरपरिषेदेचे पितळ उघडे, नाल्याचे पाणी रस्त्यावर*

सतिश म्हस्के
जालना जिल्हा प्रतिनिधी
शहरात सोमवारी (दि 7) रोजी दुपारी मुसळधार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह झालेल्या धुवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. नाल्या तुंबल्याने घान पाणी रस्त्यावर वाहत होते, त्यामुळे नालेसफाईची प्रक्रिया वाहून गेल्याचे दिसून आले, अनेक भागात विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता.