नाशिक मध्ये सावत्र आई झाली वैरणी, आई कडुन मूकबधीर मुलावर अमानुष अत्याचार; मुलाचा गुप्तांगाला दिले चटके.

58

✒नाशिक जिल्हा प्रतिनिधी✒
नाशिक,दि.8 जुन:- नाशिक जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्हामध्ये राहणा-या एका सावत्र आईने आपल्या अल्पवयीन मुलावर अमानुषरित्या अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा अल्पवयीन मुलगा मुकबधीर आहे. या सावत्र आईने रागाच्या भरात आपल्या मुलाच्या गुप्तांगावर चटके दिले. या मुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक जिल्हातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे या गावात ही धक्कादायक घटना घडली. सावत्र आईकडून मुलावर अमानुषरित्या अत्याचार केला जात होता. मात्र, सोमवारी या महिलेने अमानुषपणाचा कळस गाठला. तिने रागाच्या भरात मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले. तसेच मुलाला बेदम मारहाणही केली. त्यामुळे या मुलाची प्रकृती बिघडली. त्यानंतर ग्रामस्थांनी या अल्पवयीन मुलाला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.