परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत योजनेच्या लाभासाठी आवाहन.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) :– ऑटोरिक्षा परवानाधारकांनी शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी परवानाधारक वाहन क्रमांक, आधार क्रमांक, परवाना क्रमांक नमूद करणे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणी आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत सोपी आहे. तरी जास्तीत जास्त ऑटोरिक्षा परवानाधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे.
राज्यातील ऑटोरिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी रु. 1 हजार 500 एकवेळचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. सदर योजनेचे कामकाज 20 मेपासून चालू करण्यात आलेले आहे. 6 जूनपर्यंत जिल्ह्यातील एकूण 8 हजार 459 परवानाधारकांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. प्राप्त अर्जापैकी 6 हजार 909 इतके अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंजूर केले असून 1 हजार 550 अर्ज दुरुस्ती करिता परत करण्यात आलेले आहेत.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परवाना धारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य या लिंकवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी कळविले आहे.