100 टक्के लसीकरण व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याची सक्ती शहरांमध्ये करा -रवींद्र ठाकरे

54

100 टक्के लसीकरण व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याची सक्ती शहरांमध्ये करा -रवींद्र ठाकरे

जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच दिवशी घेतला आठ नगरपरिषद यांचा आढावा

100 टक्के लसीकरण व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याची सक्ती शहरांमध्ये करा -रवींद्र ठाकरे
100 टक्के लसीकरण व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याची सक्ती शहरांमध्ये करा -रवींद्र ठाकरे

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
नागपूर दि. 8:- पावसाळ्याच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढणार नाही, 100 टक्के लसीकरण होईल, यासाठी जिल्ह्यातील नगर परिषदेचा आढावा आज घेण्यात आला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी एकाच दिवशी आठ नगर पारिषदेला आज भेट दिली.

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, वानाडोंगरी, वाडी, सावनेर, खापा, मोहपा, कळमेश्वर, आदी नगरपरिषदेला आज त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान मान्सून पूर्व तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंधित करण्यासाठी नगरपालिकेच्या नियोजनाची माहिती घेतली. सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने त्यांनी लसीकरणावर भर दिला. कोरोना प्रतिबंधासाठी 100% उपाय म्हणजे सर्व नागरिकांचे लसीकरण आहे. त्यासाठी योग्य उपाययोजना करा. सर्व नागरिक लसीकरण केंद्रावर पोहोचतील व सर्वांचे लसीकरण होईल. यासाठी नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने लग्न व कार्यक्रमानिमित्त छोट्या छोट्या शहरांमध्ये अधिक प्रमाणात येतात. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी, मंगल कार्यालय, रिसॉर्ट, हॉटेल्स या ठिकाणी जमणारी गर्दी व त्या ठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली होणार नाही. याबाबतची यंत्रणा आणखी सक्त करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नगरपालिका क्षेत्रातील दवाखाने, तालुक्याच्या ठिकाणी व मोठ्या शहरात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर तसेच सर्व सरकारी वैद्यकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व म्युकरमाकॉसिस सारख्या आजारासाठी सज्ज असल्या बाबतचा आढावा नियमित घेण्याच्या सूचनाही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

पावसाळ्यापूर्वी शहराची स्वच्छता शुद्ध पाणीपुरवठा नळाचे लिकेज काढणे याकडे लक्षवेध देण्याचे त्यांनी सांगितले आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्मिती व जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी अधिक सुलभ संपर्क व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील सर्व गावांमधील आरोग्य व्यवस्थेच्या आढाव्यासाठी 52 अधिकार्‍यांची चमू कार्यान्वित केली होती. त्यानंतर आता या आठवड्यात त्यांनी स्वतः नगरपालिकांना भेटी देणे सुरू केले आहे. उद्या उर्वरित नगरपरिषदेला भेटी दिल्या जाणार आहेत.