रक्तदान करणे हे ईश्वरीय कार्य; सचिन कोतपल्लीवार
स्वेच्छा रक्तदानाचा दहावा दिवस आ. सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवारचा उपक्रम

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- कोरोनाच्या संकटामध्ये रक्तदात्यांची संख्या रोडावली आहे. याला अनेक बाबी जबाबदार आहेत. असे असले तरीही रक्तदानाचे कार्य आपणच करू शकतो. रक्तदानामुळे अनेकांचा जीव वाचतो. रक्तदान हे ईश्वरीय कार्य आहे, असे प्रतिपादन भाजपा महानगरचे मध्य मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार यांनी केले.
ते आ. सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे मंगळवार (८ जून) ला आयएमए सभागृहात आयोजित स्वेच्छा रक्तदान शिबीरात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारचे संयोजक डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, प्रकाश धारणे,प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोतपल्लीवार म्हणाले, कोरोना लसीकरणामुळे अनेक रक्तदात्यांत रक्तदानाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले, परंतु लसीकरणाचा रक्तदान केल्यावर कोणताही दुष्परिणाम होत नसून लसीकरणाच्या १४ दिवसानंतर व कोरोनातुन सुटका झाल्यावर २८ दिवसानंतर रक्तदान करता येते. या मार्गदर्शक सुचनेची नोंद घेवून रक्तदान केले पाहीजे. यावेळी नुकुल मुल्लेवार, कुणाल मुल्लेवार, धिरज बुरडकर, अतुल श्रीमंतवार, अभय राऊत या युवकांनी रक्तदान केले. रक्त संकलनाची जबाबदारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील चमुने पूर्ण केली. यात डॉ. किर्ती साने, समाजसेवक अधीक्षक संजय गावीत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ उत्तम सावंत यांचा समावेश होता. सर्व रक्तदात्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने फेसशिल्ड देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक रक्तदान शिबीरचे मुख्य संयोजक प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. रामकुमार अक्कापेल्लीवार यांनी आभार मानले.