संविधान चौक हिंगणघाट येथे प्रलय तेलंग यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट:- येथील संविधान चौक येथील सार्वजनिक कार्यालया वर हल्ला करणाऱ्या वर अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. म्हणुन आज संविधान चौक येथे हायवे वर चक्का जाम आंदोलन करणयात आले. व हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे अशी नारेबाजी करण्यात आली.
हिंगणघाट येथील संविधान चौक येथे असलेले सम्यक बुद्ध विहार सार्वजनिक सामाजिक कार्यालयावर दिनांक ०५ जुनला रात्री १२.१५ च्या सुमारास एका हिंगणघाटच्या सटोड्यानी १४ ते १५ गुंड लोकांच्या सहकार्याने संविधान चौक येथील कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली तसेच कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे बॅनर असलेल्या बॅनरची विटंबना केली. या प्रकरणाची पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दाखल करण्यात आली असून या हल्लेखोरांवर पोलीस प्रशासनाने अद्याप अटक केली नाही.त्यानिमित्त संविधान चौक हिंगणघाट येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
हल्लेखोरांवर पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलून कार्यवाही करावी.अन्यथा आणखी तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा सुद्धा देण्यात आला. त्यावेळी आंदोलनकर्ते प्रलय तेलंग , शाहरुख बक्ष,अनिल मून ,अभिषेक गावंडे ,अमरदीप बनसोड ,अमित झांबरे, प्रवीण भगत, कुणाल वासेकर ,विपुल भगत ,जयपाल तामगाडगे, सुभाश खैरे ,आशिष खेडकर, आरिफ शेख, ज्वलंत मून, अनिमेश टिपले, बाबाराव फुलकर ,जोशना रामटेके इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.