कोविड रुग्णांसाठी किमान 20 टक्के खाटा आवश्यक; नॉनकोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करा: जिल्हाधिकारी नवाल

53

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अमरावती;- कोरोनाबाधितांची संख्या सध्या घटत असली तरी खासगी कोविड रुग्णालये बंद करता येणार नाहीत. आवश्यकतेनुसार नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करावा. मात्र, रुग्णालयाच्या एकूण खाटांपैकी 20 टक्के खाटा कोविड रुग्णांसाठी राखून ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे खासगी रुग्णालयांना दिले.

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील डॉक्टर व प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे, सचिन सानप आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, बाधित घटले तरी गाफील राहून चालणार नाही. तिस-या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी रुग्णालयांनीही उपचार यंत्रणा नॉनकोविडमध्ये रुपांतरित करु नये. कोविडसाठी किमान 20 टक्के खाटा राखीव असाव्यात. नॉन कोविडसाठी स्वतंत्र वॉर्ड करताना येण्या-जाण्याचा मार्ग स्वतंत्र असावा. 50 खाटांची व त्यावरील क्षमता असलेल्या रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लान्टची निर्मिती करावी. कोरोना देयकांच्या आकारणीबाबत तक्रारी लक्षात घेऊन ऑडिट टीम स्थापण्यात आली आहे. या टीमने ऑडिटचे काम काटेकोरपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेत अंगीकृत करण्यात यावेत. त्याचप्रमाणे, मोर्शी आणि धारणी येथे डायलिसिस सेंटर उभारणीच्या प्रक्रियेला गती द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.