नागपुरमध्ये अंबाळा तलावात बुडून दोन मुलाचा मृत्यु.

✒️युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒️
नागपूर,दि.9 जुन:- नागपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपूर येथील दोन विद्यार्थ्यांचा रामटेकमधील अंबाळा तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या बातमीमुळे सर्वीकडे हयहय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. निसर्ग प्रभाकर वाघ वय 18 वर्ष रा.सेमीनरी हिल्स व कुणाल अशोक नेवारे वय 18 वर्ष ,रा.रवीनगर, अशी मृतांची नावे आहेत निसर्ग आणि कुणाल दोघेही बारावीत शिकत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग याचे वडील विस्तार अधिकारी आहेत. बुधवारी सकाळी कुणाल, निसर्ग व त्याचे अन्य चार मित्र मॉर्निंग वॉकला जात असल्याचे सांगून सकाळी कारने नागपूरहून रामटेक येथे आले. ते दर्शनाला जात होतो. मात्र कोव्हिडमुळे मंदिर बंद असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर सहा जण जंगल मार्गाने अंबाळा तलाव येथे आले.
सहा पैकी चार जण तलावात आंघोळीसाठी उतरले. मात्र कुणाल व निसर्ग हे दोघे तलावात बुडाले. अन्य दोघे सुदैवाने बचावले. एका नागरिकाला ते दिसले. त्याने रामटेक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच रामटेकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी शोध घेतला असता निसर्ग याचा मृतदेह आढळून आला. रात्र झाल्याने पोलिसांनी शोध मोहीम थांबविली.