लातूर शेतात बैलगाडी पलटल्याने 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

50

लातूर शेतात बैलगाडी पलटल्याने 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

शेतात बैलगाडी पलटल्याने 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.
शेतात बैलगाडी पलटल्याने 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

✒️राम भुतडा, लातूर जिल्हा प्रतिनिधी✒️
लातूर,दि.9 जुन:- लातूर जिल्हातील जानवळ येथून एक दुखद बातमी समोर आली आहे. शेतात बैलगाडी उलटल्याने एका मुलाचा दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना चाकूर तालुक्यातील जानवळ शिवारात बुधवारी दुपारी 12 वाजता समोर आली आहे. शंतनू रामदास जानवळकर वय 11 वर्ष असे मयत मुलाचे नाव आहे. शंतनू हा वडीलांसोबत बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतात बैलगाडीसोबत गेला होता.

कोरोना वायरसच्या महामारीने सर्वीकडे हाहाकार माजवला आहे त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. शंतनू हा सध्या वडीलांसोबत शेताला नेहमी जात होता. बैलगाडीतून सोयाबीन गुळी वाहतूक केली जात होती. दरम्यान, बैलगाडी अचानक उलटली. या अपघातात शंतनूच्या डोक्याला जबर मार लागला. यावेळी रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जानवळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.