मुंबईच्या मालवणी भागात इमारत कोसळली, 11 जणांचा दाबून मृत्यू, अनेक जखमी.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई:- मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालवणी क्षेत्रात एक इमारत बुधवारी 9 जूनला मध्यरात्री पडली आहे. या इमारत दुर्घटनेत 11 जणांचा दबून जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेनच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून सांगण्यात आलंय की, मालवणी भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या 1 मजली चाळीवर कोसळले. या घटनेत 17 व्यक्ती जखमी झाले असून 11 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत.
इमारत दुर्घटनेमध्ये मृतांमध्ये 7 लहान मुलांचा समावेश
बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मालाडमधल्या मालवणी गेट क्रमांक 8 येथे ही घटना घडली आहे.
या भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या 1 मजली चाळीवर कोसळले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 7 बालकांचा समावेश आहे. इतर 7 जखमी आहेत.
ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील त्या ठिकाणी पोहचले. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली अशी माहिती त्यांनी दिली.
बचाव कार्य सुरू
मुंबईतल्या मालाड भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात लोक जखमी झाले आहेत. मालाड पश्चिमेकडे असलेल्या मालवणी भागात ही इमारत होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमींवर उपचार सुरू असून घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ज्या ठिकाणी इमारत कोसळली तिथे मुंबई महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.