95 लाखांचे कोकेन नालासोपारा येथून जप्त: सापळा रचून पोलिसांनी केली एका नायजेरिअन आरोपीला अटक.

55

95 लाखांचे कोकेन नालासोपारा येथून जप्त: सापळा रचून पोलिसांनी केली एका नायजेरिअन आरोपीला अटक.

95 लाखांचे कोकेन नालासोपारा येथून जप्त: सापळा रचून पोलिसांनी केली एका नायजेरिअन आरोपीला अटक.
95 लाखांचे कोकेन नालासोपारा येथून जप्त: सापळा रचून पोलिसांनी केली एका नायजेरिअन आरोपीला अटक.

मनोज कांबळे, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई/नालासोपारा,दि.10 जून:- नालासोपारा शहरातील तुळींज पोलीस ठाण्याच्या युनिटने दिनांक 7 जून रोजी प्रगतीनगर, नालासोपारा पूर्व येथून  478 ग्राम कोकेनची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन इसमास अटक केली. या आरोपीचं नाव सॅम्युएल फेमी वय 30 असून त्याच्याकडे सापडलेल्या कोकेनची किमंत 96 लाख इतकी आहे.

माणिकपूर पोलीस ठाण्याचे सहाहयक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार 7 जूनला  नूर बिल्डिंग, 90 फीट रोड, प्रगतीनगर, नालासोपारा पूर्व येथे या ठिकाणी एक परदेशी नागरीक कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार होता. या बातमीच्या आधारावर तुळींज पोलीस ठाण्याच्या टीमने सादर घटनास्थळी सापळा रचला आणि संध्याकाळी पाऊणे सातच्या दरम्यान बातमीदाराच्या इशाऱ्यानंतर परिसरात असलेल्या संशयी इसमास घेराव घालून ताब्यात घेतले. सदर इसमाची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे एकूण 487 ग्राम वजनाची 96 लाख किमतीची कोकेनची अंमलीपावडर सापडली.

या घटनेबाबत तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा  येथे आरोपी विरोधात गु.र.क्र. 739/21 एन.डी.पि.एस. ऍक्ट 1985 चे कलम 8(क) सह 21(क) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गेल्या काही वर्षात नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर, ओसवाल नगरच्या पलीकडील भाग हे परिसर  अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनले आहेत.  गेल्या दोन वर्षांमध्ये या परिसरात  जवळपास नऊ अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे घडले असून त्यामध्ये परदेशातून आलेल्या नायजेरियन व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आढळून येतो. या परिसरातून ऑक्टोबर 2019 आणि डिसेंबर 2019 मध्ये अनुक्रमे 13 करोड आणि 42 लाख किमतीचे एमडी या अंमली पदार्थाचे साठे पोलिसांकडून  जप्त करण्यात आले होते आणि या गुन्ह्यांत महेश राठोड आणि नेपाळ सिंग यादोन आरोपीना अटक करण्यात आली होती. जानेवारी 2020 मध्ये नालासोपारा येथे राहणाऱ्या कलीम रौफ सय्यद या 27 वर्षीय व्यक्तीला 20 करोड किमतीच्या 50 किलोच्या एमडी या अंमली पदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर मध्ये ३ लाखांच्या 33 ग्रॅम वजनाच्या कोकेनसह एका नायजेरिअन व्यक्तीला, नोव्हेंबर मध्ये 1.5 करोडच्या 750 ग्रॅम वजनाच्या कोकेनच्या साठ्यासह चार नायजेरियन नागरिकांना आणि डिसेंबर मध्ये 10.2 ग्रॅम कोकेन आणि एलएसडी पदार्थ विकणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली होती.यावर्षी हि मार्चमध्ये वसई मध्ये पाच किलो गांजाची विक्री करणाऱ्या वसईतील अशोक गायकवाड नामक व्यक्तीला आणि एप्रिल मध्ये 1698 ग्रॅम वजनाच्या व 43 लाख किमतीच्या एमडी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी गजाआड केलं होत.

नालासोपारा आणि आसपासच्या भागात जवळपास दहा ते बारा हजार नायजेरियन आणि इतर आफ्रिकन देशातील  नागरीक राहत असल्याचा पोलीस विभागाचा अंदाज आहे. त्यातले काही लोक हे अंमली पदाथाची तस्करी आणि विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याने सदर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या देशांतीलगुन्हेगारी क्षेत्रातील नागरीक भारतात आल्यानंतर आपला पासपोर्ट, ओळखपत्र आपल्या मूळच्या देशाचे कागदपत्र एकतर नष्ट करतात किंवा लपून ठेवतात.अटक झाल्यानंतर हे नागरीक आपली आणि आपल्या देशाची ओळख जाहीर करण्यास  नकार देतात, त्यामुळे ओळखपत्रांच्या अभावी ह्या नागरिकांना त्यांच्या देशात डिपोर्ट करण्यास पोलिसांना फार अवघड जात. काही नागरीक डिपोर्ट होण्यापासून वाचण्यासाठी स्वतःला जामीनपात्र गुन्ह्यामध्ये स्वतःला अटक करवून घेतात. ह्या गुन्हयाचा तपास वर्षोनुवर्षे चालत राहतो. दरम्यान हे गुन्हेगार जामिनावर बाहेर येऊन पुन्हा अंमली पदाथाची तस्करी आणि विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी होतात.

या परिस्थितीला रोखण्यासाठी परिसरातील परदेशी नागरिकांचे पासपोर्ट, ओळखपत्र, वर्क परमिट यांची योग्य तपासणी करणं, रूम रेंट अग्रीमेंटचे योग्य पोलीस वेरिफिकेशन करून भाडेकरूंचे रेकॉर्डस् पोलीस ठाण्यात जमा करणे यासारखे नियम पालघर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून राबवलेजात आहेत.