*अवैध दारू विक्रीत होणारी वाढ, कायदा व सुव्यावस्थेचा घात.* *अवैध गावठी दारू विक्रीस परवानगी देऊन ते मलाई खाणारे कोन?*

58

 

*वर्धा हिंगणघाट:- मुकेश चौधरी* वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून संपुर्ण देशात ओळखला जातो. गांधीजीच्या परीपर्शाने पावन झालेल्या या वर्धा जिल्हात शासनाने अनेक वर्षा पुर्वी संपुर्ण दारु बंदी जाहिर केली. पण आज गांधीजीच्या या जिल्हात गावठी दारुचा महापुर वाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसुन येत आहे. शहर परिसरात मोठ्या प्रमाणत होत असलेल्या अवैध दारू विक्री बद्दल मोठ्या प्रमाणात ओरड होत असूनही पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका दारूबंदी महिला मंडळाचा संताप वाढविणारी ठरत आहे.
या लॉक डाऊन मध्ये जिल्हा बंदी असूनही येवढ्या मोठ्या प्रमाणात या अवैध दारू ची वाहतूक होतेच कशी? हा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. याचा अर्थ जिल्हा बंदी आम नागरिकांसाठी च आहे काय? आणि या अवैध दारू ची वाहतूक करणाऱ्यास खुली सूट दिली असल्याचा आरोप केल्या जात आहे. शहरात ठोक पणे अवैध दारू विक्री करणार्या या कुख्यात व्यक्ती सर्व परिचित आहे पण पोलिसांनाच त्याची ओळख नाही. त्या अवैध दारू विक्रेत्याची ख्याती शहरातच नव्हे तर जिल्ह्यात झालेली आहे. पण हा व्यक्ती पोलिसाना माहीत नसल्यामुळे मोकाट फिरत आहे. लॉक डाऊन मध्ये घरासमोर उभ्या असलेल्या लोकांना काहीही विचारपूस न करता त्याच्या पार्श्व भागा वर फटके देणारे पोलीस या सर्वांना परिचित असणाऱ्या अवैध दारू विक्रेत्या वर आणि अवैध दारूची (जिल्हाबंदी असूनही) वाहतूक करणाऱ्या कुख्यात व्यक्तीस अटक करण्यास का अपयशी ठरत आहे. हे एक न उलगडणारे कोडे आहे.
शहर व परिसरातील वाढत्या अवैध दारू विक्री होत असणारी अनाठायी वाढ सामाजिक स्वास्थ बिघडविणारे आणि कायदा व सूव्यावस्थेची वाट लावणारे ठरत आहे. कालच अवैध दारू ची वाहतूक करणार्या स्कॉर्पिओ या वाहनाने भरधाव येऊन मुख्याधिकारी याच्य निवास स्थान क्या तटरक्षक भिंतीला धडक दिली. जर ती भिंत नसती तर काय अनर्थ घडला असता, याची कल्पना केलेली बरी.