कळमेश्वर मध्ये बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

51

कळमेश्वर मध्ये बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

कळमेश्वर मध्ये बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.
कळमेश्वर मध्ये बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर:- कळमेश्वर तालुक्यातील येथील अनुराज मल्टी स्टेट अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कळमेश्वर येथील कार्यालयात विर बिरसा मुंडा यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मून साहेब, मिडिया वार्ता न्युजचे नागपुर जिल्हा प्रतिनिधी युवराज मेश्राम, ईश्वर भलावी, संस्थेचे अध्यक्ष चार्ट फ्रोम आने सचिन यावलकर, भंवर मैडम, गिरी मैडम आणि संस्थेचे कर्मचारी जीवन बागडे उपस्थीत होते. यावेळी या सर्व उपस्थीत लोकांनी विर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फुल माला अर्पण करुन त्यांना मानवंदना दिली. आणि आपले विचार व्यक्त केले.

बिरसा मुंडा यांचे वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आदिवासींना इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध एकत्र केले. त्यांनी “अबुआ राज क्षेत्र जन, महाराणी राज टुंडी जाना”, म्हणजे राणीचा राज्य संपवू आणि आपले स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करू, अशी घोषणा दिली. या घोषणेने ब्रिटीश राजांची चकमक हादरली.

बिरसा मुंडा यांना ब्रिटिश सैन्याने मार्च 10 रोजी झारखंडच्या जंगलात आपल्या गनिमी सैन्यासह झोपलेले असताना अटक केली होती. 9 जून 1900 रोजी रांची तुरुंगात त्याचा गूढ मृत्यू झाला. ब्रिटीशांनी असा दावा केला होता की बिरसा मुंडा कॉलरामुळे मरण पावला, असे म्हणतात की त्यांनी या आजाराची कोणतीही लक्षणे दाखविली नाहीत. जेलचे नाव बिरसा मुंडा असे ठेवले गेले आहे.