वर्धा जिल्हात चालत्या कार मध्ये आली ड्रायव्हरला झोपेची डुलकी, कार आदळली महामंडळाच्या एसटी बसवर.

59

वर्धा जिल्हात चालत्या कार मध्ये आली ड्रायव्हरला झोपेची डुलकी, कार आदळली महामंडळाच्या एसटी बसवर.

वर्धा जिल्हात चालत्या कार मध्ये आली ड्रायव्हरला झोपेची डुलकी, कार आदळली महामंडळाच्या एसटी बसवर.
वर्धा जिल्हात चालत्या कार मध्ये आली ड्रायव्हरला झोपेची डुलकी, कार आदळली महामंडळाच्या एसटी बसवर.

✒आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.10 जुन:- नागपुर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. वड़की येथे झायलो चार चाकी कारने जाण्यास निघालेल्या कार ड्रायव्हरला झोपेची डुलकी आल्याने चारचाकी कार अनियंत्रित होऊन रोडच्या पलीकडे असलेल्या डिवायडर ओलांडून महामंडळाच्या एसटी बसवर जावून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात झायलो चारचाकी कारचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याचे समोर आले आहे. ही घटना आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास दारोडा या परीसरात घडली. या अपघाता नंतर बघणा-याची गर्दी जमा झाली होती.

या अपघातात महामंडळाची एसटी बस राळेगांव येथून हिंगणघाट या आगारात जाण्यासाठी निघाली होती, पण हिंगणघाट येणाच्या काही किलोमीटर अगोदरच एसटी बसचा अपघात झाला त्यात बस मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहे, परंतु सुदैवाने या अपघात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

खापा(नागपुर) येथून वड़की येथे जाण्यासाठी चालक झायलो राजेंद्र कांबले हा खापा येथून निघाला, सोबत कारमधे संजीवन गनावरसिंग यांचेसह दोघेही प्रवासाला निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरुन दारोडा शिवारात आले असता झायलो चालक राजेंद्र कांबळे यास झोपेची डुलकी आली,यावेळी कार अनियंत्रित होऊन डिवाइडर पार करुन रस्त्याचे दुसऱ्या बाजूस पुढे गेली. याचवेळी राळेगांव येथून विरुद्ध दिशेने हिंगणघाट येथे निघालेली एस टी बस क्र.एमएच 07 सी-9083 सहा प्रवाशासह भरधाव वेगाने तेथून जात होती.

अनपेक्षितरित्या झायलो कार मधेच आल्याने एसटी चालक इमरान खान अफसरखान याने प्रसंगावधान साधुन एसटी बस जागीच थांबविली,त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळी पोचुन वाहतुक सुरळीत केली सदर प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मसराम, सोनपितळे तसेच पोलिस कर्मचारी अजय वानखेड़े, राहुल गिरडे, गणेश मेश्राम, प्रफुल चन्दनखेड़े इत्यादि करीत आहेत.