डोंबिवली 3 चोरट्या महिला पोलीसांचा जाळात, दुकानांत जाऊन दुकानदाराशी बोलण्यात गुंतवून करायच्या चोरी.

51

डोंबिवली 3 चोरट्या महिला पोलीसांचा जाळात, दुकानांत जाऊन दुकानदाराशी बोलण्यात गुंतवून करायच्या चोरी.

3 चोरट्या महिला पोलीसांचा जाळात, दुकानांत जाऊन दुकानदाराशी बोलण्यात गुंतवून करायच्या चोरी.
3 चोरट्या महिला पोलीसांचा जाळात, दुकानांत जाऊन दुकानदाराशी बोलण्यात गुंतवून करायच्या चोरी.

अभिजित सपकाळ, मुंबई प्रतिनिधी ✒
ठाणे,दि.11 जुन:- आज मुंबई शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यात महिला चोरट्या पण मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचे समोर येत आहे. अशाच 3 चोरट्या महीलाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या चोरट्या महिला कुठल्याही दुकानात जाऊन दुकानदारांना आपल्या बोलण्यात गुंतवून चोरी करत असायच्या डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी या महिलांवर कारवाई केली आहे. प्राची जाधव, छाया जाधव आणि रेश्मा जाधव असे या तिघींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तीन महिला अंबरनाथला राहतात. त्या अंबरनाथ, डोंबिवली या परिसरातील दुकानांमध्ये जाऊन दुकानदाराला आपल्या बोलण्यामध्ये गुंतवायच्या आणि त्यानंत एक महिला त्या दुकानातील किंमती वस्तु दुकानदाराची नजर चुकवून चोरी करायची. असाच प्रकार त्यांनी डोंबिवलीच्या एका दुकानात करण्याचा प्रयत्न केला. दुकानात जाऊन त्यांनी गीझर खरेदी करण्याचे नाटक केले. यावेळी गीझरची किंमत काय ? त्याचे वैशिष्य काय ? अशा प्रकराचे प्रश्न विचारत दुकानाच्या मालकाला गुंतवून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर बोलत असताना योग्य संधी साधत या महिलांनी दुकानातील 32 इंची टीव्ही चोरला. नंतर लगेचच मोठ्या शिताफीने त्या दुकानाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या.

मात्र, एवढा मोठा टीव्ही चोरून नेताना दुकानदाराची नजर या तीन महिलांवर पडली. त्यांच्या चोरीचे बिंग फुटले. नंतर लगेचच दुकानादाराने या महिलांना पकडून पोलिसांना पाचारण केले.

दरम्यान, पोलिसांनी या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या महिलांची चौकशी करत आहेत. आतापर्यंत केलेल्या चौकशीमध्ये या महिलांनी याआधीही अनेक ठिकाणी अशा प्रकारची चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलीस या महिलांची अजूनही सखोल चौकशी करत आहेत.