नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधुन ‘मुन्नाभाई’ नकली डॉक्टराला अटक.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
नागपुर,दि.11 जुन:- नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुर शासकीय मेडिकल मधून एक ‘मुन्नाभाई’ नकली डॉक्टरला अटक करण्यात आले. नागपुर येथील मेडिकल मध्ये कधी निवासी डॉक्टर, तर कधी वैद्यकीय अधिकारी बनून मेडिकल परिसरात फिरणाऱ्या एका नकली डॉक्टरला मेडिकल प्रशासनाने पकडले. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशाच प्रकारे तो बनावटी डॉक्टर मेडिकलमध्ये वावरत होता. मात्र, काही डॉक्टरांना त्याच्यावर शंका आल्याने तो अलगद प्रशासनाच्या हातात गवसला. त्याला अजनी पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले. विशेष असे की, कोरोनाच्या प्रादुर्भावात या मुन्नाभाईने अनेक मित्रांना सीटी स्कॅनपासून तर कार्ड काढून देण्यापर्यंत मदत करण्याचे सत्कर्म केले.
सिद्धार्थ जैन असे या मुन्नाभाईचे नाव आहे. तो वय 23 वर्षांचा आहे. दिल्लीतील एम्समधून वैद्यकीय पदवी संपादन केल्याचे सांगत होता. काहींना निवासी डॉक्टर तर काहींना मुख्य वैद्यकीय अधिकारी असल्याचा बनाव करीत होता. ऑपरेशन थिऐटरपासून तर विविध वॉर्डात बिनदिक्कत तो प्रवेश करीत होतो. रुग्णांच्या फाईल बघण्यापासून तर नातेवाईकांशी चर्चा करीत असल्याचे चौकशीतून पुढे आले. खरचं तो डॉक्टर आहे का, त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाची कोणती आणि कधी पदवी मिळविली इथपासून ते त्याचा मेडिकलमध्ये फिरणाऱ्या दलालांशी काही संबंध आहे, का याचाही पोलिसांकडून शोध सुरू झाला. मात्र, यात त्याने बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्याला डॉक्टर बनायचे होते.