ठाणे मध्ये धावत्या रिक्षातून महिलेचा मोबाईल चोरी, रस्त्यावर पडून महिलेचा मृत्यू.

✒️अभिजित सपकाळ, मुंबई, प्रतिनिधी✒️
ठाणे,दि.11 जून :- ठाण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे परिसरात नौपाडा भागामध्ये कन्मिला रायसिंग नावाची 27 वर्षीय महिला रिक्षातून प्रवास करत होती. ही महिला रिक्षाच्या कडेला बसलेली होती. तिच्या हातामध्ये मोबाईल होता. रिक्षा रस्त्यावरून जात असतानाच रिक्षाच्या जवळ एक बाईक आली. त्या बाईकवर दोन जण होते. यापैकी मागे बसलेल्या दोघांपैकी एकानं महिलेच्या हातातला मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण महिलेच्या लगेचच हा प्रकार लक्षात आल्यानं महिलेनं त्याला विरोध केला.
महिलेनं हातातला मोबाईल सोडला नाही तर चोरानं मोबाईल हिसकावण्यासाठी त्या महिलेला एक जोराचा झटका दिला, त्यात ती महिला धावत्या रिक्षातून रस्त्यावर खाली पडली. त्यामुळं महीलेल्या गंभीर स्वरुपाचा जखमा झाल्या. गंभीर परिस्थितीत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी लगेचच कारवाई केली. महिलेच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दोघांना नौपाडा पोलिसांनी 24 तासांत अटक केली.
अल्केश उर्फ परवेझ अन्सारी वय 20 वर्ष आणि सोहेल अन्सारी वय 18 वर्ष अशी आरोपींची नावं आहेत. ते दोघंही भिवंडीतील रहिवासी आहे. हे दोघंही सराईत मोबाईल चोर असून त्यांच्या विरोधात कोनगाव व नारपोली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मृत तरुणीच्या मोबाईलसह इतर तीन मोबाईल, रोकड आणि एक दुचाकी जप्त केली. ठाणे सत्र न्यायालयानं दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.