कोरोना वायरस मधून वाचला, पण जीबीएस व्हायरसची झाली लागण; सातारा जिल्हातील तरुणाचा पुण्यात मृत्यू.

51

✒सातारा जिल्हा प्रतिनिधी✒
सातारा,दि.11 जुन:- सातारा जिल्हातील फलटण तालुक्यातील आसू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आसू येथील एका मुलाचा गुलियन बेरी सिंड्रोम व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी या युवकाला कोरोना झाला होता. काही दिवसा अगोदर तो कोरोना वायरस आजारातून तो पुर्ण पणे बरा झाला होता. त्यात त्याच्या जीबीएस व्हायरसमुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेने एकच खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्हातील फलटण तालुक्यातील आसू येथील शिवराज स्वामीनाथ साबळे वय 18 वर्ष याला सुमारे एक महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. त्याचा एचआरसीटी केवळ दोन होता. या आजारातून तो पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला अशक्तपणा जाणवून प्रकृती खालावत गेली. पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला जीबीएस व्हायरस झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.

जीबीएस वायरस वाढत आहे.

गुलियन बेर्री सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने सध्या डोके वर काढले आहे. हा अज्ञात व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी, स्नायूवर हल्ला करत असल्याने हाता-पायातील ताकद जाऊन अंग लुळे पडण्याची लक्षणे असणारे अनेक रुग्ण आढळले आहेत. योग्य औषधोपचाराने हा रोग काबूत येत असला तरी, खर्चिक उपचारामुळे रुग्णाचे नातेवाईक मेटाकुटीस येत आहेत.